1.7 लाखांचा मुद्देमाल जब्त : स्थानिक गुन्हे शाखा पथकाची उत्कृष्ठ कामगिरी
गोंदिया : फिर्यादी श्री. हेमंत मोरघडे, राहणार श्रीनगर चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया हे आपले परिवारा सह जगन्नाथ पुरी येथे दर्शनाकरिता गेले असता दिनांक 18/06/ 2023 चे 16.00 वाजता ते 22/6/ 2023 चे 14. 30 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घराच्या दाराचा कुंदा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण किमती 1 लाख 59 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारदार यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अप. क्र. 409/2023 कलम 454, 457, 380 भारतिय दंड विधान संहिता प्रमाणे दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक, गोंदिया मा. श्री निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी सदर घरफोडी गुन्ह्यांचे अनुषंगाने सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा, ठाणेदार गोंदिया शहर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन गुन्हा तात्काळ उघड करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या.
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पो.नि.श्री. दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, स्था.गु.शा. पोलीस पथकाद्वारे घरफोडी गुन्ह्यांतील अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस पथक अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार नामे- बबन सुरेश भागडकर, राहणार- मरारटोली गोंदिया याने नमूद घरफोडी केली असून तो यादव तलावाकडे फिरत आहे.अश्या प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे स्थागुशा पोलीस पथकाने घरफोडी करणारे बबन सुरेश भागडकर वय 25 राहणार मरारटो ली, आझाद वॉर्ड, गोंदिया, ओम मधु नागजोती वय 29 वर्षे राहणार यादव चौक झोपडी मोहल्ला गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले. सराईत गुन्हेगार – बबन भागडकर यास नमूद घरफोडी गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मुद्देमाल बाबत विचारपूस व कसून चौकशी केली असता घरफोडी केल्याची कबुली देवून आरोपी क्रं. 2 सोबत गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल 18 ग्रॅम वजनाची पिवळसर धातूची चैन किंमती 72,000/- रूपये, 6 ग्रॅम वजनाची पिवळसर धातूची अंगठी किमती 24,000/-, रूपये, आणि पांढऱ्या धातूचे बिस्कीट व सिक्के *असा एकूण किमती 1, लाख 7000/- हजार रुपयांचा मुद्देमाल* हस्तगत करण्यात आले आहे. नमूद दोन्ही सराईत गुन्हेगारांना पुढील कारवाई करीता मुद्देमाला सह पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशिर कारवाई व तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहेत. मा. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघड करण्याची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस निरीक्षक श्री.दिनेश लबडे, स्थागुशा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्ने, पो. हवा. राजेन्द्र मिश्रा, महेश मेहर, सोमेंद्रसिंह तुरकर, इंद्रजित बिसेन, सुजित हलमारे, पोशि संतोष केदार, चापोशि. कुंभलवार यांनी केलेली आहे.



