गोंदिया : जगातील समस्त मानवसमूहाला शांती, करुणा व अहिंसेचा उपदेश देणारे तिबेटियन धम्मगुरु दलाई लामा हेच खरे सत्य योद्धा आहेत. हिंसात्मक मार्गाला थारा न देता, स्वतःची धर्म संस्कृती कायम ठेवून अहिंसात्मक मार्गाने तिबेटियन बांधवांच्या अधिकारासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांची करुणामय शिकवणूक हीच मानवाच्या कल्याणासाठी निश्चितच सार्थकी ठरणारी आहे. तिबेटियन बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती आहे.
सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवून शांती, करुणा व अहिंसेचा मूलमंत्र देणारे दलाई लामा शांतिदूत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी केले.
तालुक्यातील तिबेटियन वसाहतमधील तिबेट बांधवांच्या वतीने गोठणगाव स्थित संबोता तिबेटियन स्कूल येथे आयोजित तिबेटियन धम्मगुरू दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन आयएएस अधिकारी साई किरण, उपविभागीय अधिकारी वरुण शहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तिबेट भारत मैत्री संघ भंडाराचे अमृत बनसोड, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम रोहनकर, शुभम नवले उपस्थित होते. दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी नायर यांच्या हस्ते केक कापून जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जगाला शांती, करुणा व अहिंसेची शिकवण देणारे शांतिदूत दलाई लामा
RELATED ARTICLES






