2.51 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : गोंदिया शहर पोलीसांची कामगीरी
गोंदिया : संजय श्यामकुमार गणविर, रा. गौतमनगर, डब्लींग कॉलोनी, गोंदिया यांचे स्व.मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड , धान खरेदी केंद्र (गणविर ट्रेडर्स , कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया) येथील धान 27 कट्टे एक हजार एक, 06 पोते सुवर्णा, 14 कट्टे जय श्रीराम जातीचे धान असा किमती एकुण 51 हजार 400 रुपयांचा माल दिनांक 13/04/ 2023 ते 14/ 04/2023 चे रात्र दरम्या न कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्यांचे फिर्यादीचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रं.236/23 कलम 379 भा. दं. वि. अन्वये अज्ञात चोरट्याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने, पोलीस अधिक्षक, गोदिया, मा.श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, गोदिंया श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्री. सुनिल ताजने, यांनी पो. नि.श्री. चंद्रकांत सूर्यवंशी पो. ठाणे गोंदिया शहर यांना सदर गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन तात्काळ गून्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देश देवून आदेशित केलें होतें. या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या निर्देश, आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे चे गुन्हे प्रकटीकरण पथक घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. पथकाने प्राप्त विश्वसनिय गुप्त बातमीच्या आधारे संशयीत राजकुमार शिव शंकर विश्वकर्मा, वय 29 वर्षे, संदीप सदाराम बावनथडे, वय 26 वर्षे, अतुल संतोष पारधी, वय 22 वर्षे, तिन्ही रा. सावराटोली, गोदिया यांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या नमूद तिन्ही संशयितांना गुन्ह्यात चोरी स गेलेल्या धाना बाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिघांनीही धान चोरी केल्याचे सांगून गुन्हा कबूल केल्याने तिघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल धान 27 कट्टे एक हजार एक धान प्रत्येकी 40 किलो नी भरलेला कि. 27,000 6 पोते सुवर्णा जातीचे धान प्रत्येकी 70 किलो नी भरलेले किं.8000 रु., 14 कट्टे जय श्रीराम जातीचे धान प्रत्येकी 40 किलो नी भरलेले किंमती 16,400 रु. असा एकुण 51,400 रुपया चा माल आणि गुन्ह्यात वापरलेली एक टाटा एस वाहन क्रं. एम. एच. 31 / डी. एस. 0989, किंमती 2,लाख /- रु. असा एकुण 2,51,400 रुपयाचा माल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे . गुन्हयाचा तपास म.पो.हवा. रिना चौव्हाण, हे करीत आहेत. ही कामगीरी मा. वरिष्ठांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटी करण पथकातील सपोनि. श्री.सागर पाटील, पोहवा. कवलपालसिंह भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, ओमेश्वर मेश्राम, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि.दिनेश बिसेन, मुकेश रावते, पुरुषोत्तम देशमुख, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केलेली आहे. मा.वरिष्ठांनी केले ल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.






