धान वाहतूक करणा-या ट्रकला अचानक आग, गोरेगावची घटना

0
238

गोंदिया : प्रगती सुशिक्षित धान खरेदी संस्था, हिरापूर येथील गोडाऊनमधून धान भरून राजफुड राईस मिल, गणखैरा येथे निघालेल्या ट्रकला वाटेत अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता ट्रक क्रमांक MH 04-GC 3877 हा धान भरून जात असताना त्याला अचानक आग लागली. ही घटना गोंदिया कोहमारा रोड गोरेगाव शहरात साईबार समोर घडली. आगीत ट्रकचा समोरील भाग पूर्णतः जळून नष्ट झाला असून धानाचेही आंशिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाला तातडीने कळविण्यात आले, मात्र अग्नीशमन दलास सुमारे 1 तास उशीर झाला. तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी धाडसाने पुढे येत आग पूर्णपणे विझविली. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here