Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपतीच्या निधनानंतर पत्नीनेही प्राण सोडले

पतीच्या निधनानंतर पत्नीनेही प्राण सोडले

गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडलेल्या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. एका वृद्ध दांपत्याने एकापाठोपाठ प्राण सोडले. या धक्कादायक घटनेमुळे अनेकांकडून हळहळ होत आहे. सोविंदा गोविंदा बोरकर (80) व त्यांच्या पत्नी अंजनाबाई बोरकर हे वृद्धपणाच्या काळात दोघेही एकमेकांचे आधार झाले. मात्र 12 फेब्रुवारीला गोविंदा यांचे निधन झाले. हा धक्का अंजनाबाई यांच्यासाठी मोठा आघात होता.
पतीच्या निधनामुळे त्या मनातून हादरून गेल्या. हा दुःखवियोग त्या पचवू शकल्या नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच अंजनाबाई यांचीही प्रकृती अचानकपणे खालावली. त्या अत्यावस्थ झाल्या. अशातच त्यांनीही पतीच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. आयुष्याची 50 वर्षे एकमेकांच्या साथीने घालविल्यावर जगाचा निरोपही सोबतच घेणाऱ्या या दांपत्यावर अंत्यसंस्कारही सोबतच करण्यात आले. नातलग आधीपासूनच उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनाही एकाच वेळी नातलगांनी अखेरचा निरोप दिला. हा संपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला गावात घडला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments