सर्वसामान्य जनतेला समर्पित अर्थसंकल्प : आमदार विनोद अग्रवाल

0
217

गोंदिया : आवास योजनेत ५० हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारतर्फे अतिरिक्त देण्यात येणार आहे यामुळे घरांचा दर्जा आणखी वाढेल. सौर ऊर्जेने घरातले विजबिल शून्यावर आणण्याचा शासनाचा प्रयत्न असेल सोबतच विक्रमी सोलर कृषी पंप बसविण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरूच राहणार असून अनेक लोककल्याणकारी योजना जशाच्या तश्या शासनाने सुरू ठेवल्या आहेत. आगामी पाच वर्षात लाखो रोजगार महाराष्ट्रात निर्माण होतील. उमेद मॉलमुळे महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध होईल. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. नदीजोड, जलयुक्त शिवार मुळे पाण्याची पातळी वाढेल. शेतकरी बांधवाना बियाणे, खते उपलब्ध करून देणे आणि शेतमाल वाहतूक सोपी व्हावी या करिता पाणंद रस्ते मजबूत करण्यात येणार आहेत. शहराचे सांडपाणी प्रक्रिया करून उद्योगांना देण्याचा निर्णय देखील स्वागताहार्य आहे एकूणच हा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याला शिखरावर घेऊन जाईल. दिव्यांगांसाठी जिल्हा निधी मधे १ टक्का निधी राखीव ठेवून सर्वसामान्य जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे.

महाराष्ट्राला गतिमान करणारा अर्थसंकल्प : राजकुमार बडोले

नागरिकांचे जीवनमान सुलभ करणे, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार करून रोजगार निर्मिती करण्यावर भर अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण २०२५ अनुसार आगामी पाच वर्षात लाखो रोजगारांचे सृजन होईल. सोबतच राज्यातील प्रमुख रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून यामुळे दळणवळण जलदगतीने होईल. शेतीसाठी “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतीचे आधुनिकीकरण सरकार करणार आहे. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प ज्यांमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण होण्यास गती मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, राज्यातील महापुरुषांची स्मारके देखील पूर्ण करण्यात येणार असून महाराष्ट्राला गतिमान करणारा हा अर्थसंकल्प आहे.
 – राजकुमार बडोले, माजी मंत्री, आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प राज्याला सिद्धी कडे घेऊन जाईल : लायकराम भेंडारकर

राज्याचा जाहीर झालेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून प्रत्येक बाबींवर विचार करून तयार करण्यात आला आहे. रोजगार निर्मिती वर भर, विजेचे दर कमी करणे, महिलांना प्रशिक्षण देणे, शेती मधे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रस्त्यांचे जाळे, कृषी सौर पंप वाटप, घरकुल योजनेला ५० हजार रुपये राज्याचे योगदान, प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल असे अनेक लोकहिताच्या घोषणा करण्यात आल्या असून हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प राज्याला सिद्धी कडे घेऊन जाईल.
– लायकराम भेंडारकर अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

महाराष्ट्राला संतुलित करणारा अर्थसंकल्प : पंकज रहांगडाले

शेतकरी, महिला, वृद्ध, तरुण, प्रत्येक समाज, राज्यातील प्रत्येक भागाला न्याय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. व्यवसायपूरक वातावरण निर्माण करून उद्योगांना चालना देणे आणि रोजगार निर्मिती करणे, सोबतच एक जिल्हा एक उद्योग संकल्पनांवर काम करण्यासाठी १० हजार महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अर्थसंकल्पातून कटिबद्ध दिसली. सोबतच आवास योजनेसाठी ५० हजार रुपये अतिरिक्त राज्य सरकार देणार आहे. यामुळे महाराष्ट्राला संतुलित करणारा हा अर्थसंकल्प आहे.
 – पंकज रहांगडाले, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here