Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorized20 वर्षापासून बंद अवस्थेत असलेला खंबाटा येथील यूनिवर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स...

20 वर्षापासून बंद अवस्थेत असलेला खंबाटा येथील यूनिवर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स कंपनीतील कोट्यावधीच्या भ्रष्टाचार

माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुकेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेंट घेऊन केली कठोर कार्रवाई व चौकशीची मांगणी

गोंदिया/भंडारा. भंडारा जिल्हयातील तुमसर शहरापासून ८ किमी अंतरावर असलेले मानेक नगर (खंबाटा) येथे युनिव्हरसल फेरो अँड अलाईड केमिकल्स लि. हा कारखाना असून तो मागील २० वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे हा कारखाना आजपावेतो शासनाच्या दिशाभूल करून कोट्यावधीच्या भ्रष्टाचार करत आहे.

या विषयाला गांभिर्याने लक्ष वेधुन माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आणि निवेदन सादर करून भ्रष्टाचाराची चौकशी करून कंपनीचे चेअरमन व इतर संचालक मंडळावर कठोर कारवाई करण्याची मांगणी केली आहे.

माजी पालकमंत्री यांनी पत्राद्वारे सांगितले कि, सन १९६० च्या दशकात या कारखाण्याची येथे स्थापना करण्यात आलेली असुन भंडारा जिल्हयातील हा पहिला उद्योग होता. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे ३०০০ कामगारांना रोजगार मिळाला. या कारखान्यात मॅँगनीज शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया व्हायची. नँशनल थर्मल पावर कॉरपोरेशन (NTPC) सोबत या कंपनीने करार केला होता.

या कराराअंतर्गत सवलतीच्या दरात या कंपनीला वीज मिळत होती. एनटीपीसी ने या कंपनीशी करार करताना एक अट घालून दिली होती. या अटीअंतर्गत या कंपनीमध्ये होणारे उत्पादन केवळ देशातील पोलाद प्रकल्पांना देणे बंधनकारक होते. परंतु कंपनीने या अटीला भंग करीत नियमबाह्यरित्या हे उत्पादन विदेशातील अनेक देशांना विकले.

ते पुढे म्हणाले, हा प्रकार लक्षात आल्यानंतर एनटीपीसी ने सवलतीत वीज देणे बंद केले. महाराष्ट्रातील महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून वीज घेणे सुरू केले, परंतु विजेचे हे दर कंपनीला परवडत नसल्यामुळे तसेच त्याचवेळी कंपनीमध्ये भ्रष्टचाराची विविध प्रकरणे समोर आल्यामुळे एके दिवशी ही कंपनी बंद झाली.

परंतु कंपनी कागदोपत्री बंद झाली असली तरी देखील नंतरच्या काळात कंपनीकडून मॅँम्नीज विकण्यात येत आहे. अद्यापही हा प्रकार सातत्याने सुरू आहे. कंपनीच्या मालकाने आतापर्यंत जवळपास २०० कोटी रुपयांचे रॉ मटेरियल विकलेले आहे.

सन २०१४ मध्ये आजारी उद्योगांचे कारण सांगून कंपनीने दिल्ली औद्योगिक न्यायालयाकडून २০০
कोटी रुपयांची विद्युत बिल माफ करून घेतले. या कंपनीत अजूनही ५० कोटी रुपयांचा माल शिल्लक आहे. शासकीय नियमाप्रमाणे कंपनी १० वर्षापेक्षा जास्त काळ बंद असल्यास ती जागा शेतकन्यांना परत करणे बंधनकारक आहे. परंतु असे न करता कंपनी त्या २०० एकरावरील जागेत इजराईल पद्धतीने शेती करत आहेत, असे निदर्शनास आलेले आहे.

फुके म्हणाले, विद्युत बिल माफ केल्यानंतरही कंपनीच्या मालकांनी कंपनी सुरू केली नाही. त्यामुळे कंपनीमध्ये काम करणारे ३ हजार कर्मचारी बेरोजगार झालेले असुन कुटूंबाचे उदरनिर्वाह करण्याकरीता देखील त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुकेनी मांगणी केली की, या कंपनीचे चेअरमन एफ. डी. नेतरवाला, आणि इतर संचालक मंडळ यांच्यावरशासन स्तरावर कठोर कारवाई झाली पाहिजे तथा कंपनी पुनच्छ: सुरू करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपनीकडून भरून द्यावे तसेच नोकरी गमावलेल्या कर्मचान्यांना नुकसान भरपाई कंपनी कडून देण्यात यावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments