7 आरोपीतांना घेतले ताब्यात : पोलीस ठाणे रावणवाडी पोलीसांची भरीव कामगिरी
गोंदिया : फिर्यादी गुरमीतसिंग मसासिंग भुल्लर वय 36 ववर्षे रा. डिलाराम ता. जि. फिरोजपुर राज्य- पंजाब सध्या रा. पारीजात ऑईल मिल कॅम्पाउंड, अर्जुनी पो. रावणवाडी,जिल्हा-गोंदिया यांनी दिनांक-19-01-24 रोजी पो. ठाणे रावणवाड़ी येथे तक्रार दिली की, दिनांक-28-12-2023 चे 15.00 वा.चे सुमारास त्यांचे पारीजात ऑईल मिल वरून. राहुल टैंकर सर्विस रायपुर छ. ग. चे मालक- योगेश विमलदेव ठाकुर यांचे द्वारा पाठविलेले टैंकर ड्रायव्हर सुनिल कुमार ब्रम्हानंद मिश्रा यांचेशी संगणमत करुन फिर्यादी चे कंपनीतून 322.7 क्विटल राईस ब्रँड क्रूड ऑइल कि. सु. 23, 71, 845/- रुपयांचा गुप्ता साल्वेन्ट प्रा. लिमी. कंपनी मुरैना, मध्यप्रदेश येथे न पोहचवता अफरातफर व अन्यायाने विश्वासघात करुन स्वतःचे फायद्यासाठी घेवून गेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो. ठाणे रावणवाडी येथे अप. क्रमांक 14/2024 कलम 407, 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून तपासात होते. वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे पो. नि. पो. ठाणे रावणवाडी श्री. पुरुषोत्तम अहेरकर ,यांचे मार्गदर्शनात तपास पथकाद्वारे सदर गुन्हयाचा तांत्रिकशुद्ध पद्धतीने कशोसिने तपास करुन आरोपीतांचा शोध घेतले असता सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुजरात येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले… यावरून आरोपीतांचा शोध घेणे करीता पोलीस पथक गुजरात येथे रवाना करण्यात आले होते. पोलीस पथकाने गुजरात येथे जावून आरोपीतांचा तांत्रीक माहितीच्या आधारे शोध घेवून सदर गुन्हयात आरोपी लक्की राजसिंग घेमेन्द्रसिंग जडेजा वय 36 वर्ष रा. प्लाट नंबर 9 बागेश्वरी हाउस शिप 5, वर्षामेडी ता. अंजार (कच्छ), गुजरात, राजेश अशोकभाई लिंबाचिया वय 28 वर्ष रा. प्लाट नंबर 629, 9/बी, भारत नगर, गांधीधाम (कच्छ) गुजरात, महेन्द्रकुमार हरगोवनभाई मकवाना वय 43 वर्ष रा. रविनगर, कमालपुर, ता. राधनपुर जि. पाटन, गुजरात, कल्याण ताताराव सौरभ वय 28 वर्ष रा. गोकुलधाम सोसायटी, आदीपुर (कच्छ) गुजरात, संजय हजारीलाल मावर चय 36 वर्ष रा. शांतीधाम बुध बाजार चे मागे (कच्छ) गुजरात यांना ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीतांनी टैंकर क्र. जी.जे.12/ए. जेड.2295 या क्रमांकाची नंबर प्लेट बदलुन त्यावर दुस-या क्रमांकाची नंबर प्लेट लावुन तसेच त्या क्रमांकाचे खोटे कागदपत्रे तयार करुन व आरोपी चालक महेन्द्रकुमार हरगोवनभाई मकवाना याचे सुनिल कुमार ब्रम्हानंद मिश्रा या नावाने खोटे ड्रायव्हिंग लायसन्स बनवुन सदर गुन्हा करण्याचा कट रचला होता असे गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले असून नमूद आरोपीतांचे ताब्यातून टैंकर क्रमांक जी.जे.12/ए.झेड. 2295 किंमती 30 लाख रुपये चे जप्त करण्यात आले आहे.
नमूद आरोपीतांना गुन्ह्यांत अटक करून पोलीस कोठडी रिमांड दरम्यान गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी तपास केला असता आरोपीतांनी गुन्ह्यातील अफरातफर केलेला राईस ब्रांड क्रूड आईल आरोपी मुकेश विठ्ठलभाई चौवाटीया वय 47 वर्षे रा. 115, शांतीनगर, सर्वे न. 168, मेक फॉर बोरीची, तां.अंजार, जि- कच्छभुज, राज्य- गुजरात मधुबाई भिकाबाई चौवाटीया वय 60 वर्ष रा. जांझर्डा रोड, विवान अपार्टमेन्ट, मकान नंबर 302, गोपालधाम सोसायटी, जुनागड, जि. जुनागड राज्य- गुजरात यांना विक्री केल्याचे सांगीतल्याने पोलीस पथकास पुनश्चः जुनागड गुजरात व गोडल जिल्हा राजकोट येथे पाठविण्यात येवून गुन्हयातील आरोपी मुकेश विठ्ठलभाई चौवाटीया व मधुबाई भिकाबाई चौवाटीया यांना ताब्यात घेवुन सदर गुन्हयातील अफरातफर केलेला राईस ब्रांड क्रूड ऑइल एकुण 26, 115* कि. ग्रम *कि.सु. 20 लाख 90 हजार रुपयांचा हस्तगत कऱण्यात आले. गुन्ह्यात ऑईल व टँकर असा एकूण 50 लक्ष 90 हजार/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपीतांना विचारपुस चौकशी केली असता आरोपीतांनी अशाच प्रकारचे गुन्हे विविध राज्यात केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यामधे पो. स्टे. जि. बैतुल मध्यप्रदेश अप. क्र- 72/2022 कलम 407 भादवी, *2) पो.स्टे. बिलडी* जि. बनासकाठा राज्य- गुजरात, अप.क्रमांक 316/2022 कलम 407, 209 भादवी व पो.स्टे. सदर जिल्हा- टॉक, राज्य- राजस्थान अप. क्रमांक 171/2024 कलम 407, 409, 420, 120 (ब) भादवी असे करोडो रुपयांचे मस्टर्ड आईल, राईचे आईल व राईस ब्रांड क्रूड ऑइलचे अफरातफरी चे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना मोठे यश आले आहे. संबंधीत राज्यांचे पोलीसांनी आरोपीतांचे ताब्याबाबत कायदेशिर प्रक्रिया करणेकरिता रावणवाडी पोलीसांसोबत संपर्क साधलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पो.नि. श्री. पुरूषोत्तम अहेरकर, यांचे नेतृत्वातील पोलीस तपास पथक-सपोनि सुनिल अंबुरे, पो.हवा. संजय चौहान, पंकज सव्वालाखे,नापोशि सुशिल मलेवार यांनी कामगिरी केलेली आहे.