ट्रॅक्टरवर बसून भाजप आमदाराची स्टंटबाजी

0
446

गोंदिया : कधी रिल तर कधी शोबाजी करुन प्रसिद्धी मिळवली.या स्टंटबाजीत आता आमदारही मागे राहिले नाहीत. चक्क ट्रॅक्टरवर बसून भाजप आमदाराने स्टंटबाजी केल्याने सगळीकडे चर्चा रंगली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गोंदिया-भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ते स्टंटबाजी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा देखील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला.गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरातील जीवनापियोगी साहित्य पुरात वाहून गेले आहे. याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले खासदार प्रशांत पडोळे यांनी कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी केली होती. हे प्रकरण ताजा असतानाच तिरोडा गोरेगाव विधानसभेचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून व्हिडीओ बनवला आहे.त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसत आहे. तर लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांना सांत्वन देण्याकरिता जातात की त्यांची थट्टा करायला जातात असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.रंहांगडाले यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. काहींनी त्यांच्या स्टंटचं कौतुक केलं तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here