गोंदिया स्थानकावर 9.60 लाखांची रोख जप्त

0
416

गोंदिया. रेल्वे सुरक्षा दल नागपुर विभागाने एका इसमाला 9 लाख 60 हजार रुपयांची अवैध रोख नेतानी पकडले. ही कार्रवाई 2 एप्रिल रोजी गोंदिया रेलवे स्थानकात करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा दल / दक्षिण मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे संरक्षण दल नागपूर विभाग गाड्यांमधून सर्व प्रकारच्या प्रतिबंधित वस्तू, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि सोने, चांदी आदींची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध सतत मोहिमा राबवित आहे. याच दरम्यान 2 एप्रिल रेाजी विभागीय पथकाचे प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे प्र.आ.आर. रैकवार व गुन्हे शाखा गोंदिया ने रेल्वे स्टेशन गोंदिया येथे सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास, गोंदिया स्टेशन मॅनेजर ऑफिससमोर पीएफ क्रमांक 3 येथे एका व्यक्तीला संशयास्पद स्थितीत काळ्या-निळ्या रंगाच्या हँडबॅगसह पकडण्यात आले आणि चौकशीत त्याने त्याचे नाव राकेश गोकुलदास आहुजा (51 रा. मालवीय वार्ड, रामचंद्र ऑइल मिलच्या जवळ श्रीनगर, गोंदिया) असे सांगितले. चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की बॅगेत 8 लाख 10 हजार रु. होते. त्यानंतर त्या व्यक्तीला कार्यालयात आणण्यात आले आणि उपस्थित साक्षीदारांसमोर व्हिडिओग्राफी करून त्याची कसून चौकशी केली असता बॅगेत 8,10,000 रुपयांच्या रोख रकमेव्यतिरिक्त 1,50,000 रुपये जप्त करण्यात आले. अशी एकूण 9,60,00 रुपयांची रोख जप्त करण्यात आली. वर नमूद केलेली रोकड रेल्वेने वाहून नेण्यासाठी वैध अधिकार आणि कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे व्यवहाराचे कोणतेही वैध कागदपत्रे किंवा रेकॉर्ड नाहीत. हे प्रकरण रेल्वेमार्गे रोख रकमेच्या बेकायदेशीर तस्करीचे असल्याचे आढळून आल्याने, नागपूरच्या अधिकारक्षेत्रातील आयकर विभागाला कळवण्यात आले आणि वरील जप्त केलेल्या रोख रकमेची चौकशी आयकर विभागाकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here