Tuesday, January 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedआमदार विनोद अग्रवाल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून गोंदिया विधानसभेच्या पाणी प्रश्नाकडे वेधले लक्ष

आमदार विनोद अग्रवाल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून गोंदिया विधानसभेच्या पाणी प्रश्नाकडे वेधले लक्ष

*डांगोरली बैराज च्या माध्यमातून नवेगाव देवरी आणि तेढवा सिवनी उपसा सिंचन योजना बळकट होणार*

*विशेष बाब म्हणून पिंडकेपार प्रकल्पाला मान्यता देणार*

*वाघ नदीवर लघु बंधारा बांधण्यास मान्यता देणार यामुळे रजेगाव – काटी उपसा सिंचन योजना बळकट होणार*

*हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार, गोंदिया शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार*

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या लक्षवेधी ला मान्य देत केली घोषणा*

गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु असून गोंदिया चे जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून गोंदिया विधानसभेच्या पाणी प्रश्नावर विधानसभेचे लक्ष वेधले. गोंदिया विधानसभेतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे याकरिता तेढवा – सिवनी आणि रजेगाव- काटी उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली होती तसेच नवेगाव देवरी उपसा सिंचन योजनेचे काम सुरु आहे. मात्र नदीपात्रात पाणीच राहत नसल्याने शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेचा लाभ होत नाही. गोंदिया शहराला वैनगंगा नदीपत्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे पडते ज्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील उद्भवतो. वैनगंगा नदीच्या पात्रात बैराज ची निर्मिती झाल्यास तेढवा- सिवनी आणि निर्माणाधीन नवेगाव- देवरी उपसा सिंचन योजना बळकट होईल यामुळे १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल आणि उन्हाळात उद्भवणारा गोंदिया शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. सोबतच रजेगाव – काटी उप सिंचन योजनेचे बळकटीकरण करण्यासाठी वाघ नदीवर ३ मिटर उंचीचा बंधारा बांधल्यास ५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल.

डांगोरली बैराज आणि वाघ नदीवर बंधारा बांधल्याविना उपसा सिंचन योजनेचा लाभ शेतकरी बांधवाना होणार नाही. तसेच गोंदिया शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात डांगोरली बैराज विना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न तीव्र होईल. म्हणून डांगोरली बैराज आणि वाघ नदीवर बंधारा बांधण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत केली. सोबतच तेढवा – सिवनी आणि रजेगाव – काटी उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देखील काढण्याची विनंती आमदार विनोद अग्रवाल यांनी केली. बंद पडलेल्या पिंडकेपार प्रकल्पावर देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. पिंडकेपार जलाशयाचे काम ९० टक्के पूर्ण होऊन सुद्धा हा प्रकल्प बंद पडल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणाऱ्या पाण्याची आशा हवेत विरली तसेच गोंदिया शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिंडकेपार जलाशयातून शेती सोबत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील प्रस्तावित होता. निकषात बसत नसल्याने ९० टक्के पूर्ण होऊन सुद्धा बंद करण्यात आलेल्या पिंडकेपार जलाशयाचे बांधकाम विशेष बाब म्हणून मान्यता देत परत सुरु करण्याची मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत केली आहे.

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या लक्षवेधी ला मान्य देत केली घोषणा*

आमदार विनोद अग्रवाल यांच्या लक्षवेधी वर उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देत, डांगोरली बैराज प्रकल्पाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आलेला असून त्याला राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्य देखील प्राप्त आहे. डांगोरली बैराज प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार असून ५९४ हेक्टर जमीन मध्यप्रदेशात बुडीत जाते जी खासगी आहे. २०८ हेक्टर जमीन महाराष्ट्रात बुडीत जाते जी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रश्न उद्भवणार नाही कारण अधिकांश जमीन हि सरकारी आहे. डांगोरली बैराज साठी मध्यप्रदेश सरकारची देखील मदत लागणार असून यासाठी मी मध्यप्रदेश सरकार ला पत्र पाठवून इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन डांगोरली बैराज आणि इतर प्रकल्पांवर तोडगा काढण्यसाठी बैठक घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे सगळ्या अडचणी दूरू करून डांगोरली बैराज चे बांधकाम करण्यात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर व्यक्त केला.

सोबतच रजेगाव – काटी उपसा सिंचन योजनेचे बळकटीकरण करण्यासाठी ३ मिटर उंचीचा बंधारा बांधण्याचा निर्णय झालेला असून त्याला मान्यता देण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच पिंडकेपार प्रकल्पावर भाष्य करत बंद पडलेल्या पिंडकेपार प्रकल्पातून नुसते सिंचन नव्हे तर भविष्यात गोंदिया शहराची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने परत प्रस्ताव सादर आहे. पिण्याच्या पाण्याचे कंपोनंट म्हणून पिंडकेपार प्रकल्पांला देखील विशेष बाब म्हणून पुनश्च मान्यता देण्यात येईल असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments