Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकचारगड यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने काम करण्याचे निर्देश : जिल्हाधिकारी...

कचारगड यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने काम करण्याचे निर्देश : जिल्हाधिकारी प्रजित नायर

कचारगड यात्रा पुर्वतयारी आढावा

गोंदिया : आदिवासी समाजाचे कुलदैवत श्रध्दास्थान कचारगड देवस्थानाची यात्रा यंदाच्या वर्षी दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत कचारगड येथे नियोजित आहे. या यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आज झालेल्या पुर्वतयारीच्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कचारगड देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, कचारगड यात्रेमध्ये देशभरातील आदिवासी समाज याठिकाणी श्रद्धेने येतो. यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. तसेच भाविकांना किमान मूलभूत सुविधा मिळावी याचे कटाक्षाने पालन सर्वच विभागाने करावे. यासह कुठल्याही अप्रिय घटनेसाठीही सज्ज रहावे. यात्रेच्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. पिण्याचे पाणी, रस्ते दुरुस्ती, वाहनासाठी पार्कींगची व्यवस्था, ॲम्बुलन्सची व्यवस्था, औषधांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा.

यात्रेदरम्यान एस.टी.महामंडळाने बसेसची व्यवस्था करुन त्याचे वेळापत्रक जाहीर करावे. नगर परिषदेने अग्नीशमन वाहनाची व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करण्यात यावी. साफसफाई बाबत स्थानिक ग्रामपंचायतीने व्यवस्था करावी. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या ठिकाणी बॅरिकेटींग लावण्यात यावे. नगरपरिषदेने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments