सतरा हजार पाचशे रुपयांचा दंड
गोंदिया : पोलीस अधीक्षक, गोंदिया निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे डुग्गीपार हद्दीत दिनांक- 29-12-2023 रोजी अर्जुनी/मोर मार्गे कोहमारा कडे येणाऱ्या डी.जे. चे वाहन (आयसर) क्रमांक एम.एच 35 एजे- 1034 यास डुग्गीपार पोलीसांनी नवेगांव/बांध टी- पाईट कोहमारा येथे सकाळी= 08.30 वाजता थांबवुन सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहना चे मालक यांनी वाहनाचे मुळ ढाच्या मध्ये बदल करुन त्यावर डी. जे. चे साहीत्य लावल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर वाहन पोलीस ठाणे डुग्गीपार येथे डिटेन करण्यात येवुन त्यावर कारवाई करण्यात आली. डी.जे.चे वाहन (आयसर) क्रमांक एम.एच 35 एजे-1034 याचे मालकाने वाहनाचे मुळ स्वरुपात बदल केल्याने त्याचेवर कारवाई बाबत आर.टी.ओ. गोंदिया यांना पत्र देऊन वाहनावर दंडात्मक योग्य कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला होता.
पोलीस कारवाईची दखल घेवुन आर.टी.ओ गोंदिया यांनी डी.जे.चे वाहन (आयसर) क्रमांक एम.एच 35 एजे- 1034 याच्यावर कारवाई करुन *17 हजार 500/-रुपयांचा (सतरा हजार पाचशे रुपये) दंड ठोठावला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. नित्यानंद झाँ, उपविभागीय पोलीस अधीकारी, देवरी, श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनात पो.नि. रेवचंद सिंगनजुडे, पोहवा दिपक खोटेले, पो.ना महेंद्र चौधरी, पोशि सुनील डहाके यांनी केली आहे.