Friday, October 11, 2024
Google search engine
HomeUncategorizedसमृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत होणार : देवेंद्र फडणवीस

समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत होणार : देवेंद्र फडणवीस

स्व.मनोहरभाई पटेल यांची 117 वी जयंती समारोह
गोंदिया : देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीला सुद्धा घेऊन जाणार आहोत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाºया शेतकºयांना होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंती व सुवर्ण पदक वितरण समारोह कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल व अभिनेते जॅकी श्राफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, विजय रहांगडाले, सहेसराम कोरेटे व गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती वर्षा पटेल प्रामुख्याने उपस्थित होत्या. गडचिरोलीला स्टील हब आॅफ इंडियाच्या रूपाने विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून गुंतवणूक सुद्धा येत आहे. केवळ निर्यातच नाही तर उत्पादन सुद्धा गडचिरोलीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामागार्चा विस्तार गोंदिया पर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग आम्ही गडचिरोलीला सुद्धा घेऊन जाणार आहोत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाºया शेतकºयांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
9 फेब्रुवारी ही स्व.मनोहरभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. योगायोग असा की 9 फेब्रुवारी हा माज्या वडिलांचा सुध्दा वाढदिवस आहे. विद्यार्थ्यांनी खुप परिश्रम घेऊन अभ्यास करावा. आपले आरोग्य सृदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज सकाळी योगा केला पाहिजे. लग्न करणाºया जोडप्यांनी पहिले आपली रक्त तपासणी केली पाहिजे. एक-दुसºयांचा मान-सन्मान केला पाहिजे. देशाची सेवा करण्यासाठी युवकांनी आपले योगदान दिले पाहिजे, असे अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले. स्व.मनोहरभाई पटेल यांनी एकाच दिवसात 22 शाळा सुरु केल्या व जिल्हा परिषदेला दान दिल्या. यावेळी सत्यार्थ-बोध ग्रंथाचे विमोचन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट पत्रकारितेसाठी देशोन्नतीचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम, नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी स्व.रमणकुमार मेठी, समाजसेवेमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जुगलकिशोर अग्रवाल, ललित थानथराटे, देवेश मिश्रा. इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे हरिष मोटघरे (गोंदिया) व शमशीर अब्दुल वहाब खान (भंडारा). जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी टिकाराम गहाणे, स्वप्नील नंदनवार. उत्कृष्ट खेळाडू जान्हवी रंगनाथन, ज्योती गडेरिया यांचा स्वर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मानले.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments