अवैध वाळू उत्खनन, 35.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
232

गोंदिया : डुग्गीपार हद्दीतील चुलबंद नदीच्या पात्रात काही लोक अवैध रित्या रेतीचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करीत आहेत. अश्या खात्रीशीर माहिती च्या आधारे आज, 20/04/ 2023 रोजी स्था.गु.शा. पोलीस पथकाने सापळा रचून वाळूचे उत्खनन व चोरी करणाऱ्याना अवैधरित्या वाहतूक करतांना कोहमारा ते देवरी कडे जाणाऱ्या हायवे रोड वरील शशिकरण पहाडी घाट परिसरात छापा घालून धाड कारवाई केली. चुलबंद नदी पात्रातून अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करतांना मिळून आल्याने 2 वाहणे ( 10 चाकी अशोक लेलँड कंपनीचा हायवा वाहन, व 6 चाकी टिप्पर किंमती 35 लाख रु ) आणि 7 ब्रास वाळू किमत 35 हजार रु. अशी एकूण किंमत 35 लाख 35 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी हायवा व टीप्पर चालक मालक आरोपी नामे 1) महेश शंकर डुंबरे वय 40 वर्ष रा. वार्ड क्र. 03 कोहमारा, 2) विशाल बाबुलाल रहिले वय 25 वर्षे रा. भरेगाव ता. देवरी जि. गोंदिया यांचे विरुद्ध अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरी प्रकरणी पोलीस ठाणे डूग्गीपार येथे कलम 379 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असून डूग्गीपार पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास डूग्गीपार पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक दिनेश लबडे , यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. महेश विघ्ने, सहा.फौज. अर्जुन कावळे, पो. हवा. भूवनलाल देशमुख, इंद्रजि त बिसेंन, पोशी- संतोष केदार, चा.पो.हवा. लक्ष्मण बंजार यांनी कामगीरी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here