Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedडेंग्यूच्या निर्मूलनासाठी परिसर स्वच्छ ठेवावा : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण

डेंग्यूच्या निर्मूलनासाठी परिसर स्वच्छ ठेवावा : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण

गोंदिया : आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यू व हिवताप निर्मूलनसाठी डास आळी सर्व्हेक्षण व गप्पी मासे पैदास केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
कीटकजन्य आजार डेंग्यू व हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी प्रामुख्याने पावसाळ्यात याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले.
आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून जनजागृती करण्यात येत आहे. वापरण्याचे पाणीसाठे हौद, रांजन, टाकी यांची तपासणी करण्यात येत आहे. डास अळी आढळून आलेल्या भांडीमध्ये डास अळीनाशक औषधे टाकण्यात येत असून छोटे कंटेनर रिकामी केली जात आहेत. डेंग्यू, हिवताप हा कीटकजन्य आजार असुन अनेक आजारांपैकी एक गंभीर आजार आहे. गर्भवती महिला व बालकांना यांचा सर्वाधिक धोका संभवतो. वेळीच उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले आहे.

अशी करा उपाययोजना
कीटकनाशक, अळी नाशकाची, डासोउत्पत्ती स्थानामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे, डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप साठे व्यवस्थित झाकून ठेवावेत. इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्तीचा वापर, नारळाच्या करवंट्या, टायर्स,फुलदाण्या, कुलर्स यामध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा, असे
आवाहनही डॉ.विनोद चव्हाण यांनी केले.

हिवताप व डेंग्यु जनजागृती साठी प्रतिबंधात्मक करावयाच्या महत्वाच्या बाबी
प्रत्येक घरामध्ये शोष खड्डा परसबाग यांची निर्मिती करणे. घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील अशी व्यवस्था करणे. शौचालयाचे सेप्टीक टैंक हे डासांचे उत्पत्ती स्थान असल्याने व्हॅन्ट पाईपला जाळी बसवणे. आठबडयातुन एकदा कोरडा दिवस पाळणे. घरा सभोवतालची गटारे वाहती करणे. बायोगॅस मध्ये जळके तेल अथवा रॉकेल टाकणे. किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे. सार्वजनिक सांडपाणी, गटारी यांची योग्य विल्हेवाट लावणे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे. ग्रामपंचायत मार्फत् खड्डे बुजवणे. गप्पी मासे मोठ्या प्रमाणात सोडणे. आवश्यकता भासलेस धुर फवारणी करणे. स्वयंसेवी संस्था, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच खाजेंगी दवाखाने यर्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेणे, घर, घराच्या परिसरात नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचू देऊ नका. डासांना घरात येण्यास रोखण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा. घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करा. घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवा. ताप येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा त्वरित सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करा. अंगाबर ताप काढू नका.येता कण कण तापाची,करा तपासणी रक्ताची. स्थलांतरीत,पत्ता सिजन मजुरांनी गावी आल्याबरोबर रक्ताची तपासणी अवश्य करावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments