राज्य आदिवासी आरोग्य समितीचा बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय पोषण पुर्नवसन केंद्र येथे भेट

0
188

गोंदिया : महाराष्ट्र राज्य आदिवासी आरोग्य समितीच्या अध्यक्षा आणि नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी (भाप्रसे) यांचा गोंदिया दौर्या प्रसंगी दुसर्या दिवशी दि.20 जुलै रोजी सकाळीच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय पोषण पुर्नवसन केंद्र येथे भेट दिली.यावेळी त्यांच्या सोबत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्री.खुश(भाप्रसेश्री.साई किरण(भाप्रसेआणि राज्य कार्यक्रम व्यवस्थापक महीला व बालकल्याण दिग्विजय शिंदे यांचा समावेश होता. पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) हे आरोग्य सुविधेतील एक महत्वाचे युनिट आहे जिथे गंभीर तीव्र कुपोषण (सॅम) असलेल्या मुलांना दाखल केले जाते आणि त्यांचे व्यवस्थापन केले जाते. मुलांना वैद्यकीय आणि पौष्टिक उपचारात्मक काळजी दिली जाते.कुपोषण हा आरोग्य आणि विकासाच्या सर्वात चिंतेचा विषय आहे.कुपोषणात वाढ खुंटणे (दीर्घकालीन कुपोषण)क्षीण होणे (तीव्र कुपोषण) आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता (आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे) यांचा समावेश होतो.
पोषण पुनर्वसन केंन्द्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत कमी वजनाचे बालकांना सरकारी वाहनातुन संदर्भित केले जाते.परंतु सद्य स्थितीत सदर पथकांना वाह्नाचा तुटवडा असल्याने मोठी अडचण असल्याचे सांगितले. तसेच कमी वजनाचे बालकांच्या घरी खाजगी कारणे त्यात शेतीचे काम,पत्ता सिजन कामामुळे पालक मुलांना भरती करण्यास टाळाटाळ करत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी याप्रसंगी सांगितले.

डॉ.मिताली सेठी यांनी आरोग्य विषयक बाबी वर चर्चा केलीव कुपोषण विषयक समस्याबालकांना एनआरसी मध्ये दाखल केले नंतर होणारी वजनवाढ,अंगणवाडी,आशा सेविका व आरबीएसके पथकामार्फत होणारी फॉलोअप,ओपीडी रेफरल बालविकास विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षक यांनी पोषण ट्रॅकर च्या माध्यमातुन बालकांना भरती करणे अशा विविध बांबीचा आढावा घेतला. यावेळी डॉ.सेठी यांनी पोषण पुनर्वसन केंद्र  येथे कुपोषित बालकांना भरती करुन आरोग्य सेवा सर्व स्तरावर अधिक सक्षम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दौर्‍यावेळी आरोग्य विभाग,महिला व बालकल्याण विभाग,आदिवासी विभाग व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यात प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवन राऊत ,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी  डॉ.रोशन राऊत,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल,बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार कटरे यांचा समावेश होता. हा दौरा गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागांमधील आरोग्य सेवांचे वास्तव जाणून घेण्यासाठी व त्या अनुषंगाने सुधारणा सुचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) भेटी प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत चांदेकर व दर्शन चौधरी,बालरोग तज्ञ डॉ.देशमुख,डॉ.तुरकर व डॉ.दिपाली,आहारतज्ञ स्वाती चव्हाण,मेट्रन अर्चना वासनिक,स्टाफ नर्स स्वाती बावणकर व ज्योती उके,कुक सारिका तोमर,परिचर श्रद्धा मेश्राम उपस्थित होते.

पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) हे आरोग्य सुविधेतील एक युनिट आहे जिथे गंभीर तीव्र कुपोषण (SAM) असलेल्या मुलांना भरती केले जाते आणि तिथे त्यांचे व्यवस्थापन केले जाते.मुलांना वैद्यकीय आणि पौष्टिक उपचारात्मक काळजी दिली जाते.पालकांना बुडीत मजुरी दिली जाते. NRC मधून डिस्चार्ज झाल्यानंतरमुलाला उपचारात्मक काळजी व्यतिरिक्तमुलांसाठी वेळेवरपुरेसे आणि योग्य आहार देण्यावर आणि माता आणि काळजीवाहकांच्या पूर्ण वयानुसार काळजी आणि आहार पद्धतींबद्दल कौशल्ये सुधारण्यावर विशेष लक्ष दिले जाते.याव्यतिरिक्त माता/काळजीवाहकांची क्षमता त्यांच्या मुलामधील पोषण आणि आरोग्य समस्या ओळखण्यासाठी समुपदेशन आणि समर्थनाद्वारे वाढवण्याचे प्रयत्न केले जातात.
डॉ.मिताली सेठी(भाप्रसे),महाराष्ट्र राज्य आदिवासी आरोग्य समिती अध्यक्षा तथा नंदुरबार जिल्हाधिकारी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here