गोंदिया : हृदयविकाराच्या धक्क्याने सेनेत कार्यरत जवानाचा मृत्यू झाल्याची घटना आज 3 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. देवीप्रसाद लिल्हारे रा. महालगाव ता. जि. गोंदिया असे मृतक जवानाचे नाव आहे.
देवीप्रसाद हे हिमाचल प्रदेश येथील सिमला येथे भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत होते. आज सकाळी कवायती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर उद्या चार ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या स्वगावी महालगाव येथे येईल. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती आहे.



