SP च्या विशेष पथकाची कारवाई. निर्दयतेने कत्तलीकरिता जनावरांचे वाहतूक करतांना तीन बोलेरो पिकअप जप्त, गौवंश सह 22, लाख 15 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.. 

0
314
गोंदिया।(21जाने.). गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांनी विशेष पथकास याबाबत आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरु आहे.
या अनुषंगाने आज दिनांक-21/01/2023 रोजी विशेष पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे  पोलिस ठाणे- नवेगावबांध परीसरातील मौजा- कोहलगाव येथे रात्र दरम्यान नाकाबंदी करून 4 वाजता दरम्यान छापा कारवाई केली. या कार्रवाई दरम्यान
1) वाहन क्र. एम एच- 40 सी.एम.0257
2) वाहन क्रमांक एम एच 32 क्यू. 3513
3) वाहन क्रमांक एम एच 34 बी झेड 2434 अशी तीन बोलेरो चारचाकी पिकअप वाहने मिळुन आले.
सदर मिळून आलेल्या तिन्ही बोलेरो चारचाकी पिकअप वाहनांचे डाल्याची पाहणी केली असता ताडपत्री झाकलेल्या तिन्ही पिकअप चे डाल्यामध्ये 30 नग बैल, गाय, गोरे जातीची जनावरे कोणत्याही प्रकारची हालचाल न करता निर्दयतेने कोंबलेल्या स्थितीत दिसुन आल्याने तीन चारचाकी बोलेरो पिकअप वाहने किंमती अंदाजे 20 लाख रु. व 30 नग जनावरे (बैल, गाय, गोरे) किंमती 2 लक्ष 15 हजार रू. असा एकुण 22, लाख 15 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
तसेच तिन्ही पिकअप च्या डाल्यामधील 30 जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या करीता सुकृत गौशाला कल्याणकारी संस्था, खैरी पो. पिंपळगाव ता. लाखनी जि. भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी आरोपी- वाहन क्र. एम एच- 40 सी. एम. 0257 चा चालक व सहकारी आरोपी नामे- 1) मोहन रमेश चौधरी, वय 32 वर्षे रा. आंबेडकर वार्ड, नवेगाव, ता. पवनी जि. भंडारा 2) निलेश ताराचंद भेंडर, वय 24 वर्षे रा. पहेला ता.जि. भंडारा. वाहन क्रमांक एम एच 32 क्यू. 3513 चा चालक व सहकारी आरोपी नामे 3) नामे चंद्रशेखर खेमराज लुटे, वय 27 वर्षे रा. सोमलवाडा, ता. लाखनी जि. भंडारा 4) अमित विजय देशमुख, वय 22 वर्षे रा. आकोट ता. पवनी जि. भंडारा, वाहन क्रमांक एम एच 34बी झेड 2434 चा चालक व सहकारी आरोपी नामे।5) राहूल प्रकाश गेंद, वय 33 वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी, ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर 6) पवन पितांबर अमृतकर, वय 35 वर्षे रा. वार्ड न.4 शिवनगर नागभिड, ता. नागभिड, जि.चंद्रपुर यांचे विरुध्द पोलीस ठाणे नवेगावबांध येथे कलम – 11(1),(ड), (ई),(फ),(ह),प्रा. नि. वा. का. 1960, सहकलम 5(अ), 2, 9 महा. पशु. सं. अधि.1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
आरोपी यांना नवेगावबांध पोलीसचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही नवेगावबांध पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, दया घरत, चा.पो. शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here