गोंदिया. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरच्या ऐतिहासिक दिक्षाभुमीवर आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दिक्षा देवुन ऐतिहासिक सामाजीक क्रांती केली.या क्रांतीमुळे आम्हा सर्वांच्या जीवनात नविन उर्जा प्राप्त झाली.बाबासाहेबांचे ऋण आपण कधीच फेडु शकणार नाही.मात्र आम्हाला दिलेली बुध्दाची शिकवण आणी विचार आम्हाला नेहमीच नवी दिशा दाखवीत आहे.त्यामुळे प्रत्येक समाज बांधवांनी बुध्दाचे आणी बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन आपल्या जीवनात बदल करण्याचे आवाहण या विभागाचे लोकप्रिय आमदार इंजी.राजकुमार बडोले यांनी केले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आनंद बुद्ध विहार बाकटी येथे ता.3 आयोजित “रुसला पदर मायेचा ” या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजकुमार बडोले बोलत होते.अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते.तर विशेष मार्गदर्शक म्हणुन जि.प.सदस्य रचनाताई गहाणे होत्या.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अर्जुनी-मोर. च्या नगराध्यक्ष मंजुषाताई बारसागडे,पंचायत समिती सदस्य पुष्पलताताई दृगकर, सरपंच सरिता राजगीरे,राजहंस ढोक,उपसरपंच गुलशन सांगोळे,तंमुस अध्यक्ष कपिल मेश्राम, पोलीस पाटील रतन बडवाईक, माजी सरपंच सुभाष मेश्राम, लोकेश बडोले,राधेश्याम सांगोळे,बंटी चौरे,नितेश मेश्राम, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील गोरगरीब समस्त बहुजन मागासवर्गीय समाजाच्या सर्वागीण विकासासाठी जी सामाजीक क्रांती केली.त्या क्रांतीला जगात तोड नाही.प्रत्येक समाज बांधवांनी आज बाबासाहेबांचे विचार अंगीकारले पाहीजे,सौ.रचनाताई गहाणे यांनीही आपले विचार व्यक्त करतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन मागासवर्गीय समाजासोबतच स्रियानांही समानतेचा अधिकार देवुन महिलांना आपले हक्क व अधिकार मिळवुन दिल्याचे सांगीतले.
धम्मक्रांतीमुळे अनेकांच्या जीवनातील अंधार दुर : आमदार राजकुमार बडोले
RELATED ARTICLES






