गोंदिया : गोरेगाव तालुक्यातंर्गत येत असलेल्या कटंगी बु.येथील धरण परिसरात दोन इसमांचा विद्युत करंट लागल्याने त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज 4 जानेवारीला सकाळच्या सुमारास घडली.मृतकामध्ये संपत वलथरे वय 48) व घनश्याम वलथरे( वय 32) रा.कटंगी बु.यांचा समावेश आहे.विद्यत करंट कशामुळे लागला हे अद्याप कळू शकले नसले तरी मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेल्या विजवितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर हे उघडे असल्याचे दिसून आले आहे.



