सर्वर डाऊनमुळे गेल्या १ महिन्यापासून आधारमध्ये पत्ता बद्दल करणे बंद, नागरिकांत असंतोष
गोंदिया : येथील जिल्हाधिकारी कार्यालय,पंंचायत समिती, तहसील कार्यालयात सेतू केंद्राची (Setu Center) सेवा बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून नागरिकांना सर्व्हर डाऊनचा (Server Down) फटका सहन करावा लागत आहे.त्यामुळे आधार कार्डवर पत्ता बदल करण्याकरीता सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे खाण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे आधार कार्डवर पत्ता बदल करण्याकरीता ज्या कागदपत्रांची गरज आहे,त्यामध्ये इलेक्ट्रिक बिल हे ७ व्या क्रमांकावर असताना काही खासगी केंद्रचालक इलेक्ट्रिक बिल घेण्यास स्पष्ट नकारत देत आमदाराचेच पत्र हवे असा आग्रह धरत आहेत.विशेष म्हणजे आमदार खासदारांचे पत्र हे यादीत खूप खालच्या स्थानावर असताना नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
सेतू केंद्र बंद असल्याने विविध प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे. गोंदिया तालुका सर्वात मोठा तालूका आहे. या भागातील ऑनलाइन प्रक्रिया नेहमीच खंडित होत असते. मागील अनेक दिवसांपासून कधी सर्वर डाऊन, कधी नेटची समस्या, तर कधी कृत्रिम समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, महविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.त्यातच अनेकांना पत्ता बदल करण्याकरीता केंंद्राचे चकरा मारण्याची वेळ आली आहे.
प्रवेशासाठी सेवाकेंद्र
जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर, अधिवास, शपथपत्र या प्रमापत्राची प्रवेशासाठी आवश्यता आहे. मात्र, सेतू केंद्रातील सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे प्रमाणपत्र वेळवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहेत. विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय,पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
विद्यार्थ्यांना मोठा मन:स्ताप
सद्यस्थितीत शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सेतूच्या प्रवेशद्वारावर सहर डाऊनचा फलक लागून असल्याने विद्यार्थी व पालकवर्गासमोर प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आधार कार्ड पत्ता बदलणाऱ्या कागदपत्रांची यादी
आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटवर स्पष्टपणे सूचीबद्ध आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने स्वीकारलेल्या आधार कार्ड पत्ता बदलणाऱ्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.






