Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोखंडी सेंट्रिगच्या प्लेट्स चोरणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

लोखंडी सेंट्रिगच्या प्लेट्स चोरणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

गोंदिया : फिर्यादी रामकुमार चौरागडे रा. वाजपेयी वॉर्ड, गोंदिया यांनी फुलचुर येथे जलाराम मंदिर जवळ घराचे बांधकाम, स्लॅब करीता आणून ठेवलेल्या सेंट्रिगच्या एकूण 40 नग लोखंडी प्लेटा या 23 अगस्त 2024 चे 14.00 वाजता ते 25 अगस्त 2024 रोजी चे 10 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पो.ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अप. क्र. 367/2024 कलम 303(2) भा.न्याय.संहिता 2023 प्रमाणे दाखल करण्यात आले होते. स्था.गु.शा. चे पोलीस पथक वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल, व चोरट्यांचा शोध करीत असतांना पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी  आतीष शंकर राहांगडाले, वय 30 वर्ष रा. छोटा गोंदिया, मोहित प्यारेलाल बोपचे, वय 20 वर्ष रा. छोटा गोंदिया, पवन ऊर्फ बंटी प्रभु उके, वय 25 वर्ष रा. गोविंदपुर गोंदिया, कैलास संजय चौधरी, वय 35 वर्षे, रा. फुलचूर, गोंदिया यांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवून जेरबंद केले. चौघांनाही गुन्ह्यांत चोरीस गेलेला मुद्देमाल बाबत सखोल विचारपूस चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगून कबुली दिली. त्यांचे ताब्यातून गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या संपुर्ण 40 नग लोखंडी सेंट्रिग प्लेट्स अंदाजे किंमती 19,000/- रुपये व गुन्ह्यांत वापरलेले एक Activa मो.सा. वाहन किंमती 90,000/- रूपये असा एकूण किंमती 1 लक्ष 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे..चारही अरोपीतांना गुन्ह्याचे तपास पुढील कायदेशीर प्रक्रिया कारवाई अनुषंगाने गोंदिया ग्रामीण पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. चे पथक स.पो.नि संजय तुपे, पोलीस अंमलदार भुवन देशमुख, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, चालक- खंडाते यांनी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments