तासपत्तीवर जुगार खेळणारे 7 जुगारी ताब्यात, 3.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
282

गोंदिया : गोंदिया शहर पोलीस पथक परिसरात रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतांना श्रीनगर भागात बाबा ऑईल मिल चौक गोंदिया येथे सार्वजनिक ठिकाणी काही ईसंम हे तासपत्त्यावर जुगाराचा पैशाचा हारजितचा खेळ खेळत आहेत अशी खात्री लायक माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे मोठ्या शिताफीने घेराव घालून कारवाई करत तासपत्तीवर जुगार खेळ खेळणारे नविन चंद्रकुमार डोडानी वय 34 वर्ष, लखन रमेश नागदेवे, वय 30 वर्ष, हरिश रामचंद्र आलवानी वय 37 वर्ष, अजय नारायणदास आसवानी वय 36 वर्ष, राकेश सुरेशराव वलेचा वय 32 वर्ष, भावेश सुनिल धामेचा वय 21 वर्ष, जितेश प्रकाश बजाज वय 30 वर्ष, सर्व रा. श्रीनगर सिंधि कॉलोनी गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे ताब्यातून 9 नग मोबाईल 3 नग मो.सा., 52 नग तासपत्ते व रोख रक्कम 33,450/- रूपये असा एकुण 3 लक्ष 22 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. जुगार खेळ खेळणाऱ्या ईसंमांविरुद्ध पो. ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 541/2024 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. विजय गराड, पो. ठाणे गोंदिया शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते, पो ठाणे गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक सपोनि.विजय गराड, पोलीस अंमलदार- सुदेश टेंभरे, राजु पुराम, सनोज सपाटे, सुभाष सोनवाने, सुनिल कापसे, प्रविण कन्सरे, सुनिल राहांगडाले, मपोशि. तुरकर, पटले यांनी कारवाई केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here